✳️ Railway Recruitment 2025 भारतीय रेल्वेत सुवर्णसंधी..! हजारो तरुणांसाठी स्थिर सरकारी नोकरीची संधी..!!
भारताची सर्वात मोठी सरकारी नोकरी देणारी संस्था – भारतीय रेल्वे (Indian Railways) – पुन्हा एकदा देशभरातील उमेदवारांसाठी मोठी भरती घेऊन आली आहे. RRB NTPC Recruitment 2025 अंतर्गत विविध विभागांमध्ये तब्बल 8,800 हून अधिक पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीत 12वी उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
🚆 कोणकोणती पदे भरली जाणार.?
या भरतीत रेल्वेत अनेक महत्त्वाच्या प्रशासकीय आणि ऑपरेशनल पदांचा समावेश आहे. त्यात खालील पदांचा समावेश आहे 👇
🎓 Graduate उमेदवारांसाठी पदे (एकूण 5810)
चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर – 161 जागा
स्टेशन मास्टर – 615 जागा
गुड्स ट्रेन मॅनेजर – 3416 जागा
ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट – 921 जागा
सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट – 638 जागा
🧾 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पदे (एकूण 3058)
कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक) – 2424 जागा
अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट – 394 जागा
ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट – 163 जागा
ट्रेन्स क्लर्क (लिपिक) – 77 जागा
💥 एकूण जागा: 8,868
📚 शैक्षणिक पात्रता काय आहे.?
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगळी आहे:
Graduate पदांसाठी: कोणत्याही शाखेची पदवी आवश्यक.
Typing आवश्यक असणाऱ्या पदांसाठी: इंग्रजी किंवा हिंदीमध्ये संगणकावर टायपिंग प्रवीणता हवी.
Undergraduate पदांसाठी: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण.
⏳ अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखा
Graduate उमेदवारांसाठी शेवटची तारीख: 🗓️ 20 नोव्हेंबर 2025, रात्री 11:59 वाजेपर्यंत
Undergraduate उमेदवारांसाठी शेवटची तारीख: 🗓️ 27 नोव्हेंबर 2025, रात्री 11:59 वाजेपर्यंत
👉 अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. उमेदवारांनी अधिकृत रेल्वे वेबसाईटवरून अर्ज करावा.
💰 परीक्षा फी आणि पगार
सामान्य / OBC / EWS उमेदवारांसाठी फी: ₹500/-
SC / ST / ExSM / महिला / ट्रान्सजेंडर / EBC उमेदवारांसाठी फी: ₹250/-
💸 पगार श्रेणी: ₹16,000 ते ₹35,400 पर्यंत (पदावर अवलंबून)
👥 वयोमर्यादा
01 जानेवारी 2026 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 33 वर्षे दरम्यान असावे.
SC/ST उमेदवारांना: 5 वर्षांची सूट
OBC उमेदवारांना: 3 वर्षांची सूट
🌍 नोकरी ठिकाण
या भरतीद्वारे निवड झालेल्या उमेदवारांची नेमणूक संपूर्ण भारतभरातील रेल्वे विभागांमध्ये केली जाईल. त्यामुळे देशातील कोणत्याही झोनमध्ये काम करण्याची तयारी असणं आवश्यक आहे.
📣 शेवटी काय लक्षात ठेवावे.?
भारतीय रेल्वे ही भारतातील सर्वात सुरक्षित, स्थिर आणि प्रतिष्ठित सरकारी नोकरींपैकी एक मानली जाते. या भरतीत उमेदवारांना केवळ नोकरीच नाही, तर करिअरची दिशा आणि स्थैर्य मिळणार आहे.
👉 त्यामुळे पात्र उमेदवारांनी वेळ न दवडता अर्ज नक्की करावा.
तुमच्या एका क्लिकने तुमचं भविष्य बदलू शकतं..!
तुमचा अर्ज भरण्यासाठी आणि
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी —
🔗 अधिकृत वेबसाईट : इथे क्लिक करा
🔗 ऑनलाइन अर्ज : इथे क्लिक करा