Motor Pump Subsidy
नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी असून विहिरीवरील विद्युत पंप मोटर घेण्यासाठी आता तब्बल 85 टक्के अनुदान मिळणार आहे ते कशा पद्धतीने मिळणार आहे.? आणि कुठे अर्ज करायचा आहे.? तसेच याबद्दल पात्रता काय आहे हे आता आपल्याला जाणून घ्यायचा आहे. शेतातील शेती पिकांना पाणी देण्यासाठी विद्युत पंप मोटर म्हणजेच विहिरीवरील मोटर तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही अनुदानावर घेऊ शकता आणि त्यासाठी शासनाकडून तब्बल 85 टक्के अनुदान देण्यात येत आहे आणि फक्त 25 टक्के आपला स्वतःचा हिस्सा भरायचा आहे. यासाठी सध्या महाडीबीटी पोर्टल वरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत ते कशा पद्धतीने करायचे आहेत.? हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही पोस्ट सविस्तरपणे वाचून घ्यावी.
जर तुम्हाला सुद्धा विद्युत पंप मोटरचा लाभ घ्यायचा आहे तर यासाठी ऑनलाईन पद्धतीने वरती किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा लागणार आहे. अर्ज कुठे करायचा आहे.? आणि यासाठी कोणती डॉक्युमेंट्स लागणार आहेत.? ही संपूर्ण माहिती या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला देत आहोत. शेतामधील पिकांना पाणी देण्यासाठी विद्युत पंप मोटर अतिशय आवश्यक असते. शेतकऱ्यांनी हा पंप घेण्यासाठी त्यांना खर्च खूप मोठ्या प्रमाणात येतो पण हा विद्युत पंप खरेदी करण्यासाठी आता शासन 85 टक्के अनुदान देत आहे.
यासाठी तुम्हाला एक अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोण कोणती डॉक्युमेंट लागणार आहे हे देखील आज आपण जाणून घेऊया.
विद्युत पंप मोटर साठी खालील डॉक्युमेंट लागणार
शेतकऱ्याचे आधार कार्ड
शेत जमिनीचा सातबारा
सातबारा वर विहीर नोंद करावी लागेल
बँक अकाउंट झेरॉक्स
पॅन कार्ड
पासपोर्ट साईज फोटो
वरील सर्व डॉक्युमेंट्स मोटर पंप अनुदान घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागणार आहेत मित्रांनो यासाठी अर्ज कसा पद्धतीने करायचा आहे.? हे देखील खाली माहिती दिलेली आहे ती जाणून घ्या.
असा करा ऑनलाईन अर्ज.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज खाली किंवा वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही महाडीबीटी या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन करू शकता.
जर तुम्ही या वेबसाईट वरती पहिल्यांदा आला आहात तर नवीन अर्जदार नोंदणी या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. जर तुमची नोंदणी या अगोदर केलीच असेल तर फक्त लॉगिन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे.
लॉगिन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करा असे निळ्या बटनावर ऑप्शन दिसणार आहे त्यावर क्लिक करा.
आता आपल्यासमोर बरेच ऑप्शन दिसणार आहेत त्यापैकी सूचना साधने आणि सुविधा या पुढील बाबी निवडा आणि या ऑप्शन वर क्लिक करा.
आता या ठिकाणी तुम्हाला काही माहिती भरायची आहे जसे की आपल्या गाव तालुका जिल्हा सिंचन साधने या ऑप्शनमध्ये फॉर्म सेट, इंजन, मोटर यापैकी एक पर्याय आपल्याला निवडून जी इलेक्ट्रिक मोटर लागणार आहे ती मोटर निवडायची आहे.
यानंतर आपल्याला एक ऑप्शन असेल त्यामध्ये मी पूर्व संमतीशिवाय अर्ज करणार नाही या ऑप्शनवर क्लिक करून सबमिट करून पुढे प्रेस करायचा आहे.
आता पुढे आपला अर्ज यशस्वीरित्या झालेला आहे की नाही किंवा अर्ज मध्ये काही चूक झालेली असेल तर अगोदर तपासायचे आहे आणि त्यानंतर खाली सबमिट या ऑप्शन वरती पुन्हा एकदा क्लिक करायचा आहे.
पुन्हा एकदा मेन पेजवर अर्ज सादर करा या ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे.
त्या ठिकाणी पहा या ऑप्शन वरती क्लिक करा आणि आता तुम्ही केलेले सगळे अर्ज तुम्हाला दिसणार आहेत त्यापैकी ज्या अर्जाचा लाभ तुम्हाला अगोदर घ्यायचा आहे त्याला एक नंबर असे प्राधान्य द्यायचे आहे.
आता खाली आपल्याला अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक करून अर्जाची फीस म्हणून 30 ते 60 रुपये भरावी लागणार आहेत हे ऑनलाईन पद्धतीने पैसे भरायचे आहेत.
पेमेंट प्रक्रिया अतिशय सोपी असून आता आपण फोन पे द्वारे सुद्धा आपल्या मोबाईल नंबर टाकून पेमेंट करू शकतो.
पेमेंट केलेली एक प्रिंट आपल्याला मिळणार आहे ती प्रिंट आपल्याकडे जपून ठेवायचे आहे. आता तुमचा अर्ज यशस्वीरित्या सादर झालेला आहे.
या आहेत अटी आणि शर्ती.
अर्जदार शेतकरी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
शेतकऱ्याकडे स्वतःची विहीर किंवा बोरवेल असावा
शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न 2 लाख पेक्षा कमी असावी.
विद्युत पंप मोटर अर्ज या https://mahadbt.maharashtra.gov.in/login/login लिंक वर करावा.