PM Vishwakarma Free Silai Machine Yojana
नमस्कार मित्रांनो विश्वकर्मा या योजनेअंतर्गत मोफत शिलाई मशीन तसेच विविध प्रकारच्या बिजनेससाठी अवजारांचे वाटप सुरू आहे आणि खास करून शिलाई मशीन साठी महिलांना त्यांच्या खात्यामध्ये शिलाई मशीनचे पैसे हस्तांतरित करण्यात येत आहेत. त्यासाठी तुम्हाला विश्वकर्मा योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करायचा आहे ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक आणि या न्यूज पोर्टल वरती देतच आहोत आणि इतर माहिती सुद्धा देत आहोत.
महिलांना सक्षम करण्यासाठी तसेच त्यांना घरी बसून कोणतेही काम करण्यासोबतच उद्योग धंद्यांमध्ये महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करण्याच्या हेतूने आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी महिलांसाठी मोफत शिलाई मशीन वाटप योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक राज्यांमधील पन्नास हजार पेक्षाही अधिक परिवारातील महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप करण्यात येत आहे आणि यामुळे महिलांचे कुटुंबाकडे सुद्धा लक्ष राहून सक्षमीकरण होण्यास वाढ होणार आहे. तसेच मित्रांनो या योजनेचे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना हे आहे याच योजनेअंतर्गत या मोफत शिलाई मशीन आणि इतर उद्योगधंद्यांसाठी सुद्धा अर्ज चालू आहेत.
प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजनेच्या अंतर्गत राज्यातील आणि शहरी भागातील तसेच खेडेगावातील या विविध क्षेत्रातील महिलांना आर्थिक बाबतीत सक्षम करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. तुम्हाला सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल आणि या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर या योजनेअंतर्गत पात्रता आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज करण्याची प्रक्रिया या संबंधित पूर्ण माहिती तुम्हाला पहावी लागणार आहे.
योजनेचे नाव – ✍️ विश्वकर्मा योजना
योजना कोणी सुरू केली.? – ✍️ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
संबंधित विभाग -✍️ महिला कल्याण आणि उत्थान विभाग
लाभार्थी कोण आहेत.? – ✍️ देशातील आर्थिक स्वरूपात कमजोर असलेले कामगार
उद्देश काय.? – ✍️ गरीब महिलांना मोफत शिलाई मशीन उपलब्ध करून देणे
अर्ज कसा करावा.? – ✍️ ऑनलाईन
आवश्यक कागदपत्रे.
आधार कार्ड
रहिवासी प्रमाणपत्र
उत्पन्न प्रमाणपत्र
वयाचा दाखला
मोबाईल नंबर
पासपोर्ट साईज फोटो
अपंग असल्यावर वैद्यकीय प्रमाणपत्र
विधवा असल्यास विधवा प्रमाणपत्र
मोफत शिलाई मशीन योजना पात्रता
1) देशातील सर्व आर्थिक आणि दुर्बल घटकातील महिला या योजनेसाठी पात्र असतील.
2) विधवा आणि अपंग महिला सुद्धा या योजनेमध्ये अर्ज करू शकतात.
3) मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्जदार महिलेचे वय 20 ते 40 दरम्यान असावे.
4) कामगार महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपये यांच्यात असावे.
5) या योजनेमध्ये अर्ज करणाऱ्या महिलांच्या घरात कोणीही सरकारी कर्मचारी नसावा.
मोफत शिलाई मशीन अर्ज 👉 या https://pmvishwakarma.gov.in/ लिंक वर करा