Msrtc Aavdel Tithe Pravas Yojana
नमस्कार मित्रांनो तुम्हाला सुद्धा एसटीने फिरण्याची खूप आवड असेल तर तुम्ही फक्त अकराशे रुपये भरून महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरू शकता अर्थातच एस टी महामंडळ अंतर्गत ही योजना काढण्यात आलेली असून या योजनेचे नाव आहे “आवडेल तिथे कुठेही प्रवास” या योजनेची अंमलबजावणी सुद्धा झालेली असून फक्त अकराशे रुपये भरून आपण महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरू शकणार आहोत. तर मित्रांनो या योजनेमध्ये आपल्याला सहभाग कशा पद्धतीने घ्यायचा आहे आणि यासाठी कुठे काय अर्ज करायचा आहे याबद्दल सविस्तर माहिती तालुक्याच्या एस टी आगरमध्ये मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत आवडेल तिथे कुठेही प्रवास करण्याची योजना सन 1988 पासून सुरू करण्यात आलेली आहे तसेच या योजनेच्या अंतर्गत सात दिवसाचा आणि चार दिवसाचा पास मिळत असतो आणि या पाच ची किंमत ही 585 रुपये असून तीन हजार रुपयापर्यंत सुद्धा असते. या योजनेमध्ये तुम्ही साधी जलद रात्र सेवा शहरी व यशवंती यासारख्या महाराष्ट्र राज्यातील बस मध्ये प्रवास करू शकणार आहात तसेच शिवशाही या बस मध्ये सुद्धा तुम्ही या योजनेअंतर्गत प्रवास करू शकणार आहात. या योजनेचे काही नियम व अटी आहेत त्या नियमांमध्ये सात दिवस तसेच चार दिवसाचा प्रवास पास आपल्याला दिला जातो.
सध्या सेवेचे पास सर्व प्रकारच्या साध्या सेवेसाठी असणारे यामध्ये साधी, जलद, रात्राणी, शहरी, यशवंती यासारख्या आंतरराष्ट्रीय मार्गामध्ये चालणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे. नीम आराम बस साठी स्वतंत्र वेगळे दर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत निश्चित करण्यात आलेले आहेत. शिवशाही बस साठी देण्यात येणारा पास हा शिवशाही बसेस साधी निमा राम वातानुकूलित या सर्व बससाठी आंतरराज्य म्हणजेच फक्त महाराष्ट्रासाठी ग्राह्य असणार आहे हे सुद्धा सर्वांनी लक्षात घ्यावे. दहा दिवसा अगोदर हे पाच दिले जातात त्यासाठी आपल्याला फिरण्याचा दहा दिवसा अगोदर या पाच साठी अर्ज करावा लागणार आहे.
आवडेल तिथे कुठेही प्रवास या योजनेचा पास नियमित बसेस सोबत कोणतेही जादा बसेस मध्ये तसेच यात्रेसाठी सोडण्यात येणाऱ्या बस मध्ये सुद्धा ग्राह्य धरले जात असतात त्यामुळे आपल्याला कुठेही फिरायचं असेल कुठेही जायचं असेल तर आपण यामध्ये एकदम बिनधास्त प्रवास करू शकतो. मित्रांनो तुम्हाला जर आता आरक्षित जागा पाहिजे असेल तर यासाठी वेगळे पैसे तुम्हाला द्यावे लागणार आहेत आणि ती जागा तुमची सीट आरक्षित तुम्ही करू शकणार आहात ज्यामुळे आपल्याला व्यवस्थित प्रवास सुद्धा करता येणार आहे. एक विशेष गोष्ट म्हणजे हा पास अहस्तांतरणीय म्हणजे कोणालाही देता येणार नाही त्यावर फक्त तुम्ही स्वतःच प्रवास करू शकणार आहात. तर मित्रांनो या आवडेल तिथे कुठेही प्रवास योजनेमध्ये अर्ज तुम्हाला करायचा असेल तर मला सुद्धा महाराष्ट्रभर अकराशे रुपये फिरायचं असेल तर तालुक्याच्या एस टी आगरमध्ये भेट द्या..