Namo Shetkari Yojana Beneficiary List Maharashtra नमस्कार मित्रांनो तुम्ही जर नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आनंदाचीच बातमी आहे कारण की नमो शेतकरी योजनेची लाभार्थी यादी जाहीर झालेली असून. या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे कशा पद्धतीने चेक करायचा आहे.? याची माहिती आज आम्ही या न्यूज पोर्टल वरती घेणार आहोत. मित्रांनो या योजनेअंतर्गत शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा होत असतात. आणि या योजनेसाठी पंतप्रधान निधी योजनेचा ज्यांना मिळतो याचा लाभ त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे. पंतप्रधान निधी म्हणजेच पीएम किसान सन्मान निधी ही योजना होय. शेतकरी बांधवांना निश्चित उत्पन्न मिळण्यासाठी केंद्र शासना अंतर्गत प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजना सुरू केली असून ही योजना केंद्र शासनाने विहित केलेल्या नियमाप्रमाणे आणि वेळोवेळी केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निर्देशाप्रमाणे शासन त्यांच्या कार्यान्वये राज्यात राबविण्यात येत असणाऱ्या संदर्भ क्रमांक 2 शासन निर्णय सदर योजना राबविण्याचा कार्यपद्धती सुधारणा करण्यात येत आहे. माननीय विद्या मंत्री महोदयांची 2023 24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये अन्नदाता बळीराजा उत्पन्न वाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मानित योजनेत राज्य सरकारच्या अनुदानाची भर घालणारी योजना म्हणजेच “नमो शेतकरी महासन्मान निधी योजना” ही योजना आहे.
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर ती नमो शेतकरी महासंघ निधी योजना राज्यात राबवण्याबद्दलचा प्रस्ताव दिनांक 30-5-2023 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्य करण्यात आलेला आहे. मित्रांनो या योजनेसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना म्हणून आपण गृहीत धरण्यात यावेत. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत पीएम किसान या वेबसाईट वरती नोंदणी केलेले आणि केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे लाभास पात्र ठरलेले सर्व लाभार्थी शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र असणार आहेत. अर्थातच तुम्ही जर पी एम किसान योजनेचे लाभार्थी आहात तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा लाभ सुद्धा मिळणार आहे. तसेच केंद्र शासनाने लाभार्थी पात्रतेबद्दल वेळोवेळी नियम अटींमध्ये बदल केलेले असून तात्काळ परिणाम आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना ही नियम देखील लागू होणार आहेत. तर मित्रांनो या योजनेची यादी तुम्हाला पाहायचे असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही पाहू शकता.
अशी पहा नमो शेतकरी योजना लाभार्थी यादी.
मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी या 👉 https://pmkisan.gov.in/ 👈 अधिकृत पोर्टल वरती जावं लागणार आहे.
अधिकृत वेबसाईट वरती गेल्यानंतर थोडं खाली आल्यानंतर फार्मर कॉर्नर मध्ये आपल्याला लाभार्थी यादी ऑप्शन दिसणार आहे त्यावर क्लिक करा.
आपले महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून त्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करा आणि त्यानंतर आपला ब्लॉग सिलेक्ट करा त्यानंतर आपल्या गावाचे नाव सिलेक्ट करा.
आता आपल्याला गेट रिपोर्ट या पर्यायावर ती क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या गावातील सर्व लाभार्थी शेतकऱ्यांची नावे दिसणार आहेत.
समोर आलेले सर्व शेतकरी हे नमो शेतकरी योजनेचा लाभार्थी यादीमध्ये असणार आहे.
मित्रांनो तुम्हाला कोणतीही पुन्हा नोंदणी वगैरे करावी लागणार नाही कारण की तुमचा पीएम किसन चा हप्ता जर सुरू असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा लाभ सुद्धा मिळणार आहे.