Ladki Bahin Installment
नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी या योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी शासनाने 3000 रुपये आर्थिक लाभ देण्याची तरतूद केलेली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना ऑक्टोबरच्या हप्त्याची अजून पैसे मिळाले नाहीत आणि याच पैशांची वाट या महिला आतुरतेने पाहत आहेत. ऑक्टोबर चा हप्ता हा ऑक्टोबर महिना झाल्यानंतर सुद्धा महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले नसून त्यामुळे महिलांच्या मनामध्ये चिंता निर्माण झालेली आहे.
तसेच दुसरीकडे सरकारकडून लाडकी बहीण योजनेची केवायसी नियोजित वेळेनुसार करण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आलेली आहे. या केवायसी प्रक्रियेमुळे सुद्धा हप्ता थांबला जाऊ शकतो असाही प्रश्न महिलांना पडलेला आहे. लाडकी बहीण योजनेबद्दल बोलायचं जर झालं तर या योजनेअंतर्गत आपल्या सर्वांना माहीतच आहे प्रति महिना पंधराशे रुपये महिलांना त्यांच्या खात्यामध्ये शासनाकडून लाभ दिला जात आहे.
तसेच या योजनेमधून पात्र ठरणाऱ्या महिलांना आर्थिक लाभ दरवर्षी 18 हजार रुपयांचा दिला जात असतो. तसेच या योजनेअंतर्गत जुलै 2024 ते सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये 15 हप्ते वाटप करण्यात आली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेचा सोळावा हप्ता पात्र महिलांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे याबद्दल सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि काही माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत.
3 हजार रुपये होणार खात्यात जमा..!!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमी वरती आचारसंहिता लागणार आहे. आणि सहाजिकच आहे की आचारसंहितेच्या काळामध्ये सरकारकडून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे ट्रान्सफर करता येणार नाहीत. यामुळे आता महाराष्ट्र सरकार स्थानिक निवडणुका घेण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळेच लाडक्या बहिणींना खुश करण्याकरिता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकाच वेळी शासनाकडून महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जाऊ शकतात. त्यामुळे या दोन महिन्याचे मिळून तीन हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत.